Posts

१९ सप्टेंबर शिव दिनविशेष

⛳आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष⛳ 📜 १९ सप्टेंबर इ.स.१६७१ महाराजांचे धारराव निंबाळकर सुभेदार यांस पत्र !          इ.स. १६७१ ला महाराजांनी शंभुराजे यांस कारभार सांगितला, त्याच वेळी त्यांना स्वतंत्र लेखकही दीले गेले. छत्रपती शिवाजी महाराजांनी धारराव निंबाळकर सुभेदार यांस पत्र लिहून त्यास महादजी यमाजी नावाच्या कारकुणास सालीना १०० होन पगार देण्याचे ठरवून लेखक म्हणून दीला. "हे मानइले हुजूर चिरंजीव संभाजीराजे याकडे वाकेनिविसाचे मुतालिकेस होते. त्यांचे देणे द्यावे अशी आज्ञा आहे. 🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻 📜 १९ सप्टेंबर इ.स.१६८३ छत्रपती संभाजीराजेनी उत्तर कोकणातील पोर्तुगीजांच्या चौल वर हल्ला केला होता.या हल्ल्याने पोर्तुगीजांचे जबरदस्त नुकसान झाले होते.मराठ्यांचा हा वेढा उठवण्यासाठी आणि मुघलांनी कोकण ताब्यात घेण्यापूर्वी आपण तो जिंकण्यासाठी गोव्याचा पोर्तुगीज विजरई कोंदी दि आलव्होर याने मराठ्यांच्या ताब्यातील फोंडा किल्ल्यावर हल्ला करायचे ठरवले. आपण फोड्यावर हाला केला तर मराठे चौल वरून माघार घेतील असा त्याचा समज होता.त्यापूर्वी त्याने गोव्यातील जनतेला कळवले की संभाजीराजे मोठ्या

१३ जुलै शिव दिनविशेष

⛳ आजचे शिव'कालीन ऐतिहासीक दिनविशेष ⛳   📜 १३ जुलै इ.स.१६६० ( आषाढ वद्य प्रतिपदा, शके १५८२, संवत्सर शार्वरी, शुक्रवार ) शिवाकाशीद काका, बाजीप्रभू काका व फुलाजी प्रभूंचे आत्मार्पण :- इथेच फुटला बांध खिंडीला, बाजीप्रभूंच्या छातीचा, इथेच फुटली छाती, तरी दिमाख ना हरला जातीचा....              आजच्या दिवशी कासारी नदीला रक्ताचे पाट वाहिले होते. शिवराय सुखरूप गेलेच पाहिजेत या जिद्दीवर बाजीप्रभू काकांनी गजाखिंड रोखून धरली होती. खिंड लढविण्यापेक्षा आडवण्याचे धोरण यशस्वी झाले. गेले ३ प्रहर भुकेले, तहानलेले बांदलसेनेने कसलीही तमा न बाळगता; आदिलशाही सैन्यसागर अवघ्या ३०० सैनिकांनी थोपवून धरला. पावसाच्या तुफान माऱ्यासोबत दगडधोंडे, गोफंगुंडे यांचा मारा कुठून येतोय हेच आदिलशाही सैन्याला कळत न्हवते. अखेर तोफेचा आवाज ऐकल्यावर गजाखिंडीत रक्ताने माखलेल्या बाजीप्रभू काकांनी मृत्यू मान्य केला.  संदर्भ:  १. प.सा.स. ८३१ २. ९१ कलमी बखर, पृ ३९ ३. जेधे शकावली 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 📜 १३ जुलै इ.स.१६६२ १३ जुलै १६६२ चं हे पत्र बाजी सर्जेराव जेधे यांनी मराठी सैनिकांना उद्देशून लिहिले आहे. या पत्राचा सारांश शिवकालीन प